भुईंज डेंजर झोनमध्ये





भुईंज गावाला डेंगूने घातलेला विळखा घट्ट होत असल्याचेच दिसून येत आहे. कारण,  डॉ. दिनेश सुर्यवंशी यांना आज बुधवारी डेंगूचे आणखी दोन रुग्ण आढळले आहेत. 

त्यामुळे डेंगू रुग्णांची संख्या ५० पर्यंत गेल्याने भुईंज गाव डेंजर झोनमध्ये गेले आहे.

डेंगूच्या रुग्णांची दिवसेंदिवस संख्या वाढत आहे. डॉ. दिनेश सूर्यवंशी हे स्वतः देखील डेंगू बाधित झाले होते. ते नुकतेच बरे होऊन पुन्हा रुग्णसेवेत दाखल झाले आहेत. त्यांच्यासह डॉ. वासुदेव पंचपोर यांनीही डेंगूच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. 

आरोग्य विभागाकडून पाहणी  व प्रबोधनाचे काम सुरू आहे तर पंचायतीने औषध फवारणी केल्याचे समजते. मात्र वरातीमागून घोडे नाचवण्यापेक्षा आहे ती परिस्थिती आटोक्यात आणून कायमच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे.

अन्यथा, 'नाव मोठं अन लक्षण खोटं'  असेच म्हणावे लागेल.

नवी पेठ, घुमट आळी, चंद्रसेननगरसह आज थेट महालक्ष्मी मंदिर परिसरात डेंगूचे २ रुग्ण आढळले आहेत.

खासगी रुग्णालयात असे रुग्ण दाखल झाल्यानंतर हजारोंच्या रकमेने खिसा रिकामा होत आहे.

त्यामुळे पंचायतीने तातडीने परिस्थिती आटोक्यात आणावी.

राहुल तांबोळी, भुईंज

Comments

Popular posts from this blog

पेट्रोल पंपावर कामाला.. तरीही CET मध्ये नंबराला

#ना खासगी क्लास ना पालकांना आर्थिक तोशीस, तरीही भुईंज येथील केबीपीच्या विद्यार्थ्यांची CET मध्ये विक्रमी कामगिरी 💪🏻💪🏻💪🏻