#ना खासगी क्लास ना पालकांना आर्थिक तोशीस, तरीही भुईंज येथील केबीपीच्या विद्यार्थ्यांची CET मध्ये विक्रमी कामगिरी 💪🏻💪🏻💪🏻


 #ना खासगी क्लास ना 
पालकांना आर्थिक तोशीस
₹₹₹

#तरीही भुईंज येथील केबीपीच्या विद्यार्थ्यांची CET मध्ये विक्रमी कामगिरी
💪🏻💪🏻💪🏻


#आंबेघरच्या आदर्शने मिळवले 97 पर्सनटाईल
💐💐💐
#हे यश भविष्यात भुईंज पॅटर्न म्हणून उदयास यावे
🙏🙏🙏

भुईंज येथील कर्मवीर भाऊराव पाटील ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी CET परीक्षेत अक्षरशः विक्रम नोंदवला आहे.

कोणत्याही खासगी क्लासला न जाता, त्यासाठी पालकांना हजारो, लाखो रुपयांची किंचितशी तोशीस न देता, केवळ वर्गात शिक्षकांकडून मिळालेले मार्गदर्शन आणि घरी केलेले स्वयं अध्ययन (self study) या बळावर CET मध्ये अनेक विद्यार्थ्यांनी उत्तम गुण प्राप्त केले आहेत.

आंबेघर, ता. जावली येथील आदर्श संतोष यादव याने तर तब्बल 96.8134847 एवढे पर्सनटाईल गुण मिळवून त्यावर कळस चढवला आहे.

आदर्शचे 7 वी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण आंबेघर येथे, 10 पर्यंतचे माध्यमिक शिक्षण हुमगाव येथे झाले तर 11 वी साठी त्याने भुईंजमध्ये रयतच्या कर्मवीर भाऊराव पाटील ज्यु. कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. पाचवडपर्यंत एस. टी. बसने येऊन तेथून भुईंजला तो चालत येत असे.

वडील मुंबईला असतात तर आई गृहिणी. अशा सर्वसामान्य कुटुंबातील आदर्शने कोणत्याही खासगी क्लास शिवाय केवळ वर्गात  शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन  आणि सेल्फ स्टडी या बळावर केलेली ही कामगिरी इतरांपुढे आदर्श निर्माण करणारी आहे. सध्याच्या खर्चिक शैक्षणिक वातावरणात सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आश्वासक दिशा दाखवणारी आहे.

आदर्श सोबत कुमारी दिव्या संतोष वाघमारे 87.5456222, बाबर विराज विकास बाबर 86.8382436, प्रथमेश प्रमोद जगताप

84.2006246, प्रसन्न अनिल यादव,

83.0041152, संचित दत्तात्रय कसबे

82.8615477, ओंकार दिलीप बोराटे

82.2034564, अजय अमरनाथ भिलारे

81.0174211, कुमारी प्रतीक्षा गणेश इंगळे 79.7907966

यासह आणखी काही विद्यार्थ्यांनी केवळ कॉलेजमधील मार्गदर्शन व सेल्फ स्टडीच्या बळावर इंजिनिअरिंग व वैद्यकीयसह इतर प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या मेरिटपर्यंत मजल मारली आहे.

पाटील सर,  पोळ मॅडम आणि जाधव मॅडम यांच्यासह कांबळे मॅडम, नष्टे मॅडम,सुर्यवंशी मॅडम यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.

रयतच्या भुईंज येथील कर्मवीर भाऊराव पाटील ज्यु. कॉलेजचे हे यश भवीष्यात भुईंज पॅटर्न म्हणून उदयास येईल, त्यासाठी अधिक ताकदीने प्रयत्न करणार असल्याचे रयतचे जनरल बॉडी सदस्य भैय्यासाहेब जाधवराव यांनी सांगून सर्व यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.

तर रयत शिक्षण संस्थेच्या वतीने विदयार्थी अशा पद्धतीने गुणवत्तापूर्ण झाले पाहिजेत यासाठी जे प्रयत्न सुरू केलेत त्याचे हे फळ असून हे यश अधिक मोठे करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्राचार्य नामदेवराव जाधव यांनी सांगितले.

विद्यालयाचे शिक्षक महेश भोईटे यांनी हर्षभरीत होत या विक्रमाची माहिती दिली त्यामुळेच ही आदर्शवत कामगिरी समजली.


सद्यस्थितीत खासजी कोचिंग क्लाससह विविध खाजगी शिक्षण संस्थांत हजारो, लाखो रुपये खर्च करून विद्यार्थी या प्रवेश परीक्षासाठी झगडत असताना रयतच्या विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षकांचे मार्गदर्शन आणि सेल्फ स्टडीच्या बळावर पालकांना आर्थिक तोशीस न देता मिळवलेले हे विक्रमी यश सर्वत्र चर्चेचा व कौतुकाचा विषय झाले आहे.

राहुल तांबोळी, भुईंज

Comments

Popular posts from this blog

भुईंज डेंजर झोनमध्ये

पेट्रोल पंपावर कामाला.. तरीही CET मध्ये नंबराला