Posts

पेट्रोल पंपावर कामाला.. तरीही CET मध्ये नंबराला

Image
 पेट्रोल पंपावर कामाला.. तरीही CET मध्ये नंबराला भुईंज येथील 'केबीपी'च्या संचितचीही नंबरी कर्तबगारी मूळ गाव धाराशिवकडचे. आई वडील पोटापाण्यासाठी पंधराएक वर्षांपूर्वी भुईंजमध्ये आलेले. ४  थी पर्यंत झेडपीच्या वारागडेवाडीतील शाळेत शिक्षण, ५ वी पासून १२ वी पर्यंत भुईंज येथील कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कुल व ज्यु. कॉलेजमध्ये शिक्षण. याच दरम्यान २०१७ साली वडिलांचे निधन झाले. घरात आई, धाकटी बहीण आणि तो. सुट्टीत काम करून घराला हातभार लावणे आवश्यकच, त्यामुळे खासगी क्लासचा विचारही करणे अशक्य. वर्गात शिकवले जाईल ते ध्यानात ठेवायचं, घरी येऊन कामातून वेळ मिळेल तसा अभ्यास करायचा. अशा अनंत अडचणीच्या परिस्थितीत बिकट परिस्थितीवर मात करत संचित दत्तात्रय कसबे याने CET मध्ये 82.8615477 पर्सनटाइन मिळवले. आजही वैशाली भट यांच्या पेट्रोल पंपावर काम करत असणाऱ्या या पोराची ही कर्तबगारी अनेकांसाठी आदर्शवत ठरावी अशीच. कोणत्याही सुविधा नाहीत, की कसले लाड नाहीत. अभ्यासाला पुरेशी साधने नाहीत, की हौसेमौजेच्या कुठल्या वस्तू नाहीत. ना छानछोकिचे जीवन ना स्वतःचं हक्काचं छप्पर. अशा परिस्थितीशी झगडत समाजाच्या शेवटच्य

भुईंज डेंजर झोनमध्ये

भुईंज गावाला डेंगूने घातलेला विळखा घट्ट होत असल्याचेच दिसून येत आहे. कारण,  डॉ. दिनेश सुर्यवंशी यांना आज बुधवारी डेंगूचे आणखी दोन रुग्ण आढळले आहेत.  त्यामुळे डेंगू रुग्णांची संख्या ५० पर्यंत गेल्याने भुईंज गाव डेंजर झोनमध्ये गेले आहे. डेंगूच्या रुग्णांची दिवसेंदिवस संख्या वाढत आहे. डॉ. दिनेश सूर्यवंशी हे स्वतः देखील डेंगू बाधित झाले होते. ते नुकतेच बरे होऊन पुन्हा रुग्णसेवेत दाखल झाले आहेत. त्यांच्यासह डॉ. वासुदेव पंचपोर यांनीही डेंगूच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे.  आरोग्य विभागाकडून पाहणी  व प्रबोधनाचे काम सुरू आहे तर पंचायतीने औषध फवारणी केल्याचे समजते. मात्र वरातीमागून घोडे नाचवण्यापेक्षा आहे ती परिस्थिती आटोक्यात आणून कायमच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा, 'नाव मोठं अन लक्षण खोटं'  असेच म्हणावे लागेल. नवी पेठ, घुमट आळी, चंद्रसेननगरसह आज थेट महालक्ष्मी मंदिर परिसरात डेंगूचे २ रुग्ण आढळले आहेत. खासगी रुग्णालयात असे रुग्ण दाखल झाल्यानंतर हजारोंच्या रकमेने खिसा रिकामा होत आहे. त्यामुळे पंचायतीने तातडीने परिस्थिती आटोक्यात आणावी. राहुल तांबोळी, भुईंज

भुईंजच्या लेकींच्या चरणी अवघी पंढरी झाली लीन

Image
  भुईंजच्या लेकींच्या चरणी अवघी पंढरी झाली लीन भुईंज येथील सायकल वेडे ग्रुप विविध साहसी सायकल मोहिमांमुळे  महाराष्ट्राबाहेरही लौकीकप्राप्त आहे. याच लौकिकात भर टाकणारी गोष्ट भुईंज ते पंढरपूर सायकलवारी मोहिमेत घडली. सलग तिसऱ्या वर्षी भुईंजचे सायकल वेडे आपली सायकल दिंडी घेऊन पंढरपूरमध्ये पोहोचले. यावेळी ग्रीष्मा योगेश शिर्के ही चिमुरडी विठ्ठलाच्या तर ईश्वरी सुनील शेवते ही चिमुरडी रखुमाईच्या वेशात पंढरीत अवतरल्या.  आणि काय सांगु देवा? सारी पंढरी या बाल मनोहर विठू रखुमाईच्या प्रेमात पडली. सारी पंढरी ग्रीष्मा व ईश्वरीच्या भोवती गोळा झाली. अक्षरशः सर्व वारकरी, भक्त, आबालवृद्ध या विठू रखुमाईसमोर लोटांगण घालू लागले.  *जेव्हा महाराष्ट्रातून आलेल्या सर्व सायकलस्वारांची दिंडी नगरप्रदक्षनेला निघाली तेव्हा तर त्या मिरवणुकीत या दोघीना रथातच उभे केले, त्यांच्या भोवती समस्त सायकल स्वार व तमाम वारकऱ्यांनी रिंगण घातले.* मिरवणूक संपली तरी वारकरी, भाविक या दोघींच्या बाजूने हटायला तयार नाहीत. अनेकांनी विनंती केली, की या दोघींना नाश्ता तरी करुद्या, त्यांनी सकाळपासून काही खाल्ले नाही. तर *उपस्थित भाविक वारकऱ्

#ना खासगी क्लास ना पालकांना आर्थिक तोशीस, तरीही भुईंज येथील केबीपीच्या विद्यार्थ्यांची CET मध्ये विक्रमी कामगिरी 💪🏻💪🏻💪🏻

Image
 #ना खासगी क्लास ना  पालकांना आर्थिक तोशीस ₹₹₹ #तरीही भुईंज येथील केबीपीच्या विद्यार्थ्यांची CET मध्ये विक्रमी कामगिरी 💪🏻💪🏻💪🏻 #आंबेघरच्या आदर्शने मिळवले 97 पर्सनटाईल 💐💐💐 #हे यश भविष्यात भुईंज पॅटर्न म्हणून उदयास यावे 🙏🙏🙏 भुईंज येथील कर्मवीर भाऊराव पाटील ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी CET परीक्षेत अक्षरशः विक्रम नोंदवला आहे. कोणत्याही खासगी क्लासला न जाता, त्यासाठी पालकांना हजारो, लाखो रुपयांची किंचितशी तोशीस न देता, केवळ वर्गात शिक्षकांकडून मिळालेले मार्गदर्शन आणि घरी केलेले स्वयं अध्ययन (self study) या बळावर CET मध्ये अनेक विद्यार्थ्यांनी उत्तम गुण प्राप्त केले आहेत. आंबेघर, ता. जावली येथील आदर्श संतोष यादव याने तर तब्बल 96.8134847 एवढे पर्सनटाईल गुण मिळवून त्यावर कळस चढवला आहे. आदर्शचे 7 वी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण आंबेघर येथे, 10 पर्यंतचे माध्यमिक शिक्षण हुमगाव येथे झाले तर 11 वी साठी त्याने भुईंजमध्ये रयतच्या कर्मवीर भाऊराव पाटील ज्यु. कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. पाचवडपर्यंत एस. टी. बसने येऊन तेथून भुईंजला तो चालत येत असे. वडील मुंबईला असतात तर आई गृहिणी. अशा सर्वसामा